डिकसल येथील डायमंड रेसिडंसीमध्ये घाणीचे साम्राज्य

रहिवासी- ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका बिल्डरच्या कचरा नियोजनाअभावाचा ग्रामस्थांना त्रास

नेरळ  : कांता हाबळे

              कर्जत तालुक्यातील डिकसल येथील डायमंड रेसिडंसी या निवासी संकुलाच्या बाहेरील बाजूस याच संकुलातील ओला तसेच सुका कचरा, प्लास्टिक, काचांचे तुकडे आणि कुजलेले अन्नधान्य आदी दुर्गंधीजन्य पदार्थांची साठवणूक ठेवले आहेत. यामुळे येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे डायमंड रेसिडंसीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याचा नाहक त्रास  येथील ग्रामस्थांनाही भोगावा लागत असल्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून या व्यवस्थापकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
             डिकसल येथील डायमंड रेसिडंसी हा प्रोजेक्ट साडेतीन एकर क्षेत्रावर उभा आहे. या रेसिडंसीमध्ये अकरा इमारतींची काम झाली असून काही इमारतींची काम बाकी आहेत.  येथे तीनशेच्या आसपास ब्लाँक असून त्यापैकी दिडशे पेक्षा जास्त ब्लॉकमध्ये आठशे ते नऊशे रहिवासी रात आहेत. येथे बिल्डरकडून कचरा साठवण्याची किंवा ठाकण्याची योग्य यंत्रणा केली नसल्याने  सर्व रहिवास्यांची घाण बिल्डरकडून प्रोजेक्टच्या एका साईटला टाकली जात आहे.
     तसेच या प्रोजेक्टच्या साईटला लागूनच एक शाळा असल्याने त्याचा गंभीर परिणाम येथील शाळेतील लहान मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो. तसेच पावसाला असल्याने हा कचरा कुजून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डायमंड रेसिडंसीच्या दोषी व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे नागरिकांकडून बोलले जात आहे. तसेच कर्जत -कल्याण रस्त्यालगत ही मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने या भागात प्रचंड कचरा साचला असून दुर्गंधी पसरली आहे. याकडे ग्रामपंचायतीने ही दुर्लक्ष केले आहे.
डायमंड रेसिडंसीच्या व्यवस्थापनाकडून जी घाण तिथेच ठाकली आहे. तिच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांनाही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच ग्रामपंचायतीने अजूबाजुला साचलेल्या कचऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. कर्जत -कल्याण राज्यमार्गा लागतही कचरा टाकण्यात आला आहे. याकडेही ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे. .– किशोर गायकवाड ( रहिवासी – डिकसळ)
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.