डिझेलच्या दरांत विक्रमी वाढ ,पेट्रोलही महागले

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

डिझेलच्या दरांत सोमवारी विक्रमी वाढ झाली आहे. डिझेलने प्रति लिटर ६९.४६ रुपये इतका उच्चांकी भाव गाठला आहे. पेट्रोलचे दरही ७८ रुपये प्रति लिटरपर्यंत होते. मुंबईत आज पेट्रोलची किंमत ८५.३३ रुपये प्रति लिटर तर डिझेल ७३.७४ रुपये प्रति लिटर आहे.

डिझेलच्या दरात १४ पैसे प्रति लिटर तर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १३ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेल ६९.४६ प्रति लिटर इतक्या उच्चांकी दरावर होते. मुंबईत डिझेल ७३.७४ रुपये प्रति लिटर झाले आहे. देशातल्या सर्व महानगरांमध्ये दिल्लीत इंधनाचे भाव सर्वात कमी आहे. येथे व्हॅट किंवा विक्रीकराची किंमत कमी असल्याने इंधनाचे दरही तुलनेने कमी आहेत. यापूर्वी दिल्लीत डिझेलचा दर २९ मे रोजी ६९.३१ रुपये प्रति लिटर इतका वाढला होता.

मुंबईत आज पेट्रोलची किंमत ८५.३३ रुपये प्रति लिटर आहे, तर दिल्लीत हाच दर ७७.९१ प्रति लिटर आहे. मात्र २९ मेच्या तुलनेत आजची वाढ कमी आहे. २९ मे ला पेट्रोलचा दर मुंबईत ८६.२४ रुपये प्रति लिटर तर दिल्लीत ७८.४३ रुपये प्रति लिटर होता.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्यानंतर १६ ऑगस्टपासून इंधनदरात सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकार सध्या पेट्रोलवर प्रति लिटर १९.४८ रुपये तर डिझेलवर १५.३३ रुपये प्रति लिटर अबकारी कर लावते तर राज्यांकडे व्हॅट लावण्यात येतो. सर्वात कमी व्हॅट अंदमान-निकोबारमध्ये (६ टक्के) तर सर्वाधिक व्हॅट मुंबईत (पेट्रोलवर ३९.१४ टक्के) आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.