डिलिव्हरी बॉयच्या महिन्याची कमाई ५० हजार

मुंबई: रायगड माझा वृत्त 

जगभरात इ-कॉमर्सचा ( ऑनलाईन शॉपिंग )  विस्तार झाल्यानंतर आपल्याला अनेक वस्तू सेवा घरबसल्या मिळायला लागल्या. या इ-कॉमर्सच्या माध्यमातून अनेक तरुण मुलांना रोजगार उपलब्ध झालेत. आपल्याला होम डिलिव्हरी देणारे डिलिव्हरी बॉय रस्त्यावरुन जाताना दिसतात. आता भली मोठी बॅग घेऊन जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयची चांदी होणार आहे. या डिलिव्हरी बॉयना महिन्याला जवळपास ५० हजार पगार मिळाणार आहे. या डिलिव्हरी बॉयच्या महिन्याची कमाई ५० हजार म्हंटल्यावर तुम्ही अवाक व्हाल. तुमच्या मनात सध्याची नोकरी सोडून हीच नोकरी करावी असा विचार येईल.

खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी देण्याचे प्रमाण  हल्लीच्या काळात जास्त पाहायला मिळते. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या परदेशी संस्थांनी भारतात आपले बस्तान बसवले आहे. या परदेशी कंपनीने डिलीवरी बॉय यांच्या महिन्याच्या कमाईत २० टक्क्याची वाढ केली आहे. यामुळे आता महिन्याला १८ ते २० हजार कमवणारे डिलिव्हरी बॉयचा पगार ५० हजाराच्या घरात जाणार आहे. परदेशी फूड संस्थेनुसार डिलिव्हरी बॉयची कमाई जवळपास ६० टक्के किंवा त्याहून अधिक वाढवले ​जाते.

Image result for order pizza food delivery boy

फूड डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या मोठ्या पगारवाढीमुळे इतर इ कॉमर्सच्या संस्थांसमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे. कारण या मोठ्या पगारवाढीमुळे त्यांच्याकडील डिलिव्हरी बॉय फूड होम डिलिव्हरी करणाऱ्या संस्थांकडे जात आहेत.

भारताच्या बंगळुरु, हैदराबाद, पुणे आणि दिल्लीमध्ये या फूड साईटवरुन खाद्यपदार्थ मागवण्याचे प्रमाण जास्त आहे.  या कंपन्या डिलीव्हरी बॉयला प्रती ऑर्डर इन्सेंटिव्ह ८० ते १२० रुपये देत आहेत. पूर्वी प्रती डिलिव्हरी ४० ते ५० रुपये मिळत होते. तसेच पावसादरम्यान डिलिव्हरी दिल्यामुळे त्यांना इंन्सेटिव्ह दिला जातो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत