डीएसके चिटर नाही; राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपामुळे चर्चेत असणाऱ्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची पाठराखण केली आहे. आज पुण्यात राज ठाकरे यांनी ठेवीदारांशी संवाद साधून डीएसकेंच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

यावेळी राज ठाकरे यांनी डीएसके यशस्वी मराठी उद्योजक असून काही राजकीय आणि अमराठी मंडळींनी षडयंत्र करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ३० वर्षांहून आधिक काळ डीएसके विविध क्षेत्रात काम करत आहेत. ते सर्वात यशस्वी मराठी उद्योजक आहेत. सध्या ते अडचणीमध्ये सापडले असून त्यांना मुंबई आणि पुण्यातील काही राजकीय आणि अमराठी मंडळी षडयंत्र करून अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या व्यक्ती कोण आहेत, याची माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान सध्या डीएसके यांच्यावर ठेवीदरांची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. डीएसके यांच्या अटकपूर्व जामिनाला काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने मुदतवाढ दिली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, डीएसके एक महाराष्ट्रीय आणि मराठी व्यावसायिक असल्यामुळे त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. त्यांच्याच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाच्या मागे उभे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत