डेक्कन, पंचवटी एक्‍स्प्रेसमध्ये सोमवारपासून फिरते ग्रंथालय

Vinod-Tawde

नाशिक : रायगड माझा वृत्त 

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी सोमवारी (ता. 15) वाचन प्रेरणा दिन साजरा होत आहे. त्या निमित्त यंदा रेल्वेत “लायब्ररी ऑन व्हिल्स’ची (फिरते ग्रंथालय) अभिनव संकल्पना 15 पासून कार्यान्वित होणार आहे. मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन व पंचवटी एक्‍स्प्रेसमध्ये रेल्वेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू होत असून, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकाद्वारे दिली.

रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने दोन्ही रेल्वे गाड्यांमधील मासिक पासधारकांसाठी आरक्षित डब्यांमध्ये मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेने नेमलेले वाचनदूत प्रवासांना विनाशुल्क वाचनसेवा देणार आहेत. मुंबई सीएसटीएममधून सायंकाळी पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन एक्‍स्प्रेस आणि सीएसटीएमवरून नाशिककडे जाणाऱ्या पंचवटी एक्‍स्प्रेसमध्ये ही वाचनसेवा सुरू होणार आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत