डेनिस मुकवेगे व नादिया मुराद यांना २०१८ सालचं शांततेचं नोबेल

लंडन : रायगड माझा ऑनलाईन

डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना २०१८ सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले आहे. युद्धांमध्ये लैंगिक हिंसाचाराचा शस्‍त्र म्‍हणून वापर करण्याच्या विरोधातील त्यांच्या प्रयत्‍नांसाठी हा पुरस्‍कार देण्यात आला. डेनिस हे आफ्रिकी देश डेमॉक्रेटिक रिपब्‍लिक ऑफ कांगो येथील आहेत. तर नादिया ही यहुदी असून इराक येथे राहणार्‍या आहेत.

डेनिस यांनी संपूर्ण जीवनभर युद्धात लैंगिक अत्याचाराला बळी ठरलेल्या लोकांचे रक्षण केले. नादिया मुराद या इराकमधील अल्‍पसंखय यहुदी समाजातील आहेत. त्यांना दहशतवाद्यांनी पकडले होते. तसेच त्यांच्यावर अनेकदा दहशतवाद्यांनी लैंगिक अत्याचार केले. कित्येकदा जबरदस्‍ती होऊनही त्या डगमगल्या नाहीत आणि सर्वोच्‍च बहादुरी दाखवल्याने त्यांना नोबेल देण्यात येत असल्याचे समितीने म्‍हटले आहे.

दरम्यान, २५ वर्षीय नादिया या शांततेचं नोबेल मिळवणार्‍या दुसर्‍या तरुण महिला आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये मलाला युसुफजई यांना वयाच्या १७ व्या वर्षी शांततेचं नोबेल मिळालं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत