डॉक्टरच ठरला नराधम; नोकराच्या मृतदेहाचे केले तुकडे

होशंगाबाद : रायगड माझा ऑनलाईन 

डॉक्टरच ठरला नराधम; नोकराच्या मृतदेहाचे केले तुकडे

मध्यप्रदेशमधील होशंगाबाद येथे एका डॉक्टरने आपल्या ड्रायव्हरची हत्या करत त्याचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील आनंद नगर भागात राहणारा हाडाचा ५० वर्षीय डॉक्टर सुनील मंत्री याने आपल्या राहत्या घरी ३० वर्षीय ड्रायव्हरची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे केले. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस चौकशीसाठी त्याच्या घरी पोहचले. त्यावेळी सुनील मृतदेहाचे तुकडे अॅसिडमध्ये टाकत होता. याप्रकरणी पोलिसांनी सुनीलला अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे.

आरोपी सुनील मंत्री इटारसीमधील शासकीय रूग्णालयात हाडांचा डॉक्टर आहे. सुनीलच्या घरी काही संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलीस सुनीलच्या घरी दाखल झाले. त्यावेळी जमिनीवर रक्ताचे डाग आणि सुनील मृतदेहाच्या तुकड्यासह आढळला. मृतदेह नष्ट करण्यासाठी तो मृतदेहाचे तुकडे अॅसिडमध्ये टाकत होती. पोलिसांना पाहून घाबरलेल्या सुनील लगेचच गुन्हा कबूल केला.

डॉक्टरचे त्याच्या ड्रायव्हरच्या पत्नीसोबत अनैनिक संबंध होते. याबाबत ड्रायव्हरला समजले तेव्हा त्याचे डॉक्टरसोबत वाद सुरू झाले. ही बाब बाहेर उघड होऊ नये यासाठी डॉक्टरने हे भनायक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांकडून मृत ड्रायव्हरच्या पत्नीची घटनास्थळी एका बंद खोलीत चौकशी सुरू आहे. पोलिसांनी लवकरच याप्रकरणी संपूर्ण खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत