डॉक्टरांना धमकी दिल्याप्रकरणी तृप्ती देसाई यांना अटक

पुणे : रायगड माझा 

पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना काळं फासण्याची धमकी देणाऱ्या ‘भूमाता ब्रिगेड’च्या नेत्या तृप्ती देसाई यांना आझ कात्रज येथून अटक करण्यात आली. चंदनवाले यांनी ते अपंग असल्याचे खोटे प्रमाणपत्र बनवले असून असे करून त्यांनी सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत देसाई यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर त्यांना कात्रज येथील त्यांच्या घरातून अटक करण्याात आली आहे.

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले हे कोणत्याही प्रकारे अपंग असल्याचे दिसत नाही. नियमांनुसार कोणत्याही पदावर एखादी व्यक्ती ३ वर्षांपेक्षा जास्त कार्यरत राहू शकत नाही. मात्र त्यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा वरदहस्त असून त्यामुळेच ते गेल्या ७ वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत. असा आरोप देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. तसेच यावेळी त्यांनी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी चंदनवाले यांची हकालपट्टी करावी नाहीतर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा देखील दिला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत