डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला ;सर्वसामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली :रायगड माझा वृत्त 


डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला असून आतापर्यंत रुपयाच्या सर्वात कमी किंमतीवर पोहचला आहे. रुपयाचा भाव ७ पैशांनी कमी होत डॉलरचा भाव ६९ रुपये १२ पैशांनी सुरु झाला. हा रूपयाचा आतापर्यंतचा सर्वात कमी दर आहे. याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रुपयाचा भाव अजून खाली जाऊ शकतो. यामुळे सर्वसामन्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

रुपयाचा दर काल (गुरुवार दि. २०) सर्वात कमी झाला होता. ४३ पैश्यांनी घसरलेल्या रुपयाचा भाव ६९ रुपये ०५ पैसे झाला होता. २९ मे नंतर झालेले रुपयाचे हे सर्वात जास्त अवमूल्यन होते.

आज संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचाही चलनावर परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रिझर्व्ह बँकेकडून चलन दराबाबत दखल घेतली जात नसल्याने रुपयाचा दर घसरत आहे.

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचे अध्यक्षांनी डॉलरच्या दरात वृद्धी झाल्याने रुपयाचे अवमूल्यन झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेत व्याजदरांमध्ये हळूहळू वाढ करण्याचा इशारा दिला आहे. या कारणामुळेच इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत डॉलरचे मुल्य वाढले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रुपयाच्या अवमूल्यनामुळे काय परिणाम होणार:

भारतात ८० टक्के पेट्रोलियम उत्पादने आयात केली जातात. रुपयाचा दर घसरल्याने तेल कंपन्या प्रेट्रो-डिझेलच्या किंमती वाढवतील. याचा फटका सर्वसामन्यांना बसणार आहे.

डिझेलचे भाव वाढल्याच त्यामुळे मालवाहतूक महाग होईल परिणामी महागाई वाढण्याची शक्यता आहे.

याशिवाव भारतात मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि डाळ आयात केली जाते. रुपयाचा भाव घसरल्याने खाद्य तेल आणि डाळ महाग होईल.

वर्षात ७ टक्के अवमूल्यन:

या वर्षात सातत्याने रुपयाची घसरण सुरु आहे. २०१७ मध्ये ७ टक्क्यांहून जास्त रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. यापूर्वी २०१३मध्ये रुपयाचा भाव ६८.८० इतक्या खाली आला होता. त्यानंतर आता तो सर्वात कमी झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत