डॉ. दाभोलकरांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात ‘जवाब दो’ आंदोलन

पुणे : रायगड माझा वृत्त 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज, पाच वर्ष पूर्ण होत आहेत. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडल्याचा दावा तपास यंत्रणांनी, या पाचव्या वर्षपूर्तीच्या आदल्या दिवशी केलाय. डॉ. दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम होत आहेत. अंनिसकडून पुण्यासह महाराष्ट्रभरात जवाब दो आंदोलन केलं जातंय.

तर या होणाऱ्या कार्यक्रमात अलीकडच्या काळात अभिव्यक्तीसाठी ठाम भूमिका घेणारे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज असणार आहेत. त्यांच्यासह दिग्दर्शक अमोल पालेकर आणि इतरही अनेकजण सहभागी झालेत.

दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही या आंदोलनात सहभाग नोंदवलाय. महर्षी शिंदे पुलावर करण्यात आलेल्या आंदोलनात सोनाली कुलकर्णीसह अनेक दिग्गज सहभागी झाले होते. यावेळी करण्यात आलेल्या जवाब दो आंदोलन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कोल्हापुरातही निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी या मॉर्निंग वॉकमध्ये सहभाग घेतला. डॉ. दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधून कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. फिरंगाई मंदिर पासून सुरू झालेला हा मॉर्निंग वॉक न्यू कॉलेज परिसरामध्ये पूर्ण करण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत