डॉ. यशवंत मनोहर यांना नारायण सुर्वे पुरस्कार

पुणे : रायगड माझा वृत्त 

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदाचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना प्रदान करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ रोजी माजी केंद्रिय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्य हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहूणे म्हणून विखे-पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे-पाटील उपस्थित राहणार आहेत, असे महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, मुख्य मानद सल्लागार महेंद्र रोकडे, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रविंद्र डोमाळे यांनी कळविले आहे.

यावेळी नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यांना, नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विजय खरे यांना, नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या एस.एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरूंगले यांना, नारायण सुर्वे सनद पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांना आणि नारायण सुर्वे कामगारभूषण पुरस्कार श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थापक गणपतराव बालवडकर यांना प्रदान केला जाणार आहे.

सोमवार दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ रोजी, संध्याकाळी ५.४५ वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे सभागृह, भांडारकर रस्ता, पुणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, मुख्य मानद सल्लागार महेंद्र रोकडे, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रविंद्र डोमाळे यांनी केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत