डॉ. रोहिदास वाघमारे यांना जय रोहिदास फाऊंडेशनचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

कोलाड : कल्पेश पवार

जय रोहिदास फाऊंडेशनच्या वतीने  “ सन्मान आपल्या बांधवाचा ” या राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार वितरण आणि जिल्हयातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे सालाबाद प्रमाणे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक 29 जुलै 2018 रोजी ग्रामपंचायत हॉल, स्वामी समर्थ नगर, पिंपळभाट, चेंढरे, अलिबाग येथे हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. 
        कार्यक्रमात सन 2018 साठीचे राज्यस्तरीय संत रोहिदास महाराज समाजभूषण पुरस्कार , जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक पुरस्कार आदिंसह आणि विशेष सत्कारांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष चेतन आंबेतकर यांनी दिली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मिनाक्षीताई पाटील,आमदार पंडीत पाटील, रा.जि. प. उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, सदस्या चित्रा पाटील, प्रियदर्शनी पाटील, संजय पाटील यांज बरोबर माजी सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील, माजी कुलगुरु डॉ. अर्जुन मुरुडकर, उपविभागीय अधिकारी अलिबाग सर्जेराव सोनावणे, संवाद मराठी, न्युज चॅनेलचे संपादक  बाबू पोटे , चेंढरे सरपंच शारदा नाईक, उपसरपंच संदेश पाटील, अॅड. परेश देशमुख, मुरुड तालुक्यातील उसरोली पंचायतीचे मा. सरपंच मनिष नांदगांवकर अलिबाग तालुका चर्मकार संघटनेचे अध्यक्ष अनिल थळकर, तालुका महिला अध्यक्षा सुचिता पालकर, रायगड जिल्हा चर्मकार संघटनेचे राकेश केळकर, चर्मकार ऐक्य परीषदचे रायगड जिल्हाध्यक्ष सचिन नांदगांवकर, रोहा तालुका  अध्यक्ष अशोक नांदगांवकर, ग्राम विकास अधिकारी श्वेता कदम आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
जय रोहिदास फाऊंडेशनने यंदा राज्यस्तरीय संत रोहिदास महाराज  समाजभूषण पुरसकारांसाठी डॉ. रोहिदास वाघमारे मुंबई , शाहीर सुरेशचंद्र अहिरे ,नाशिक, हरिश्चंद्र कदम रायगड ,  विलास देवळेकर मुंबई, सौ. वंदना बामने नवी मुंबई , विजय चौकेकर सिंधुदूर्ग, नरेंद्र चिमनकर अकोला यांची निवड केली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक पुरस्कार एच.एस.सी. करिता कु. जुई प्रदिप गोरेगांवकर आणि एस.एस.सी. करिता कु. इषाली विनोद सायगांवकर या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. रायगड जिल्हयातील संत रोहिदास समाज बांधवांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून समाज बांधवांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चेतन आंबेतकर आणि आयोजन समितीचे अध्यक्ष विनायक धाटावकर यांनी केले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत