डोंबिवलीतल्या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

रायगड माझा वृत्त 

डोंबिवलीहून सुटलेल्या सीएसएमटी फास्ट लोकलमधून एक तरुणी खाली पडून तिचा मृत्यू झाला. सविता नाईक असं या तरुणीचं नाव आहे.

ती ३० वर्षांची होती, कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून या तरुणीचा मृत्यू झाला. घटनास्थळी जीआरपीची टीम दाखल झाली आहे. या तरुणीचा मृतदेह डोंबिवलीत आणण्यात येणार आहे. डोंबिवलीत जलद लोकलमध्ये गर्दीच्यावेळी चढणं हे एक दिव्य असतं. अशा गर्दीच्यावेळीच लोकलमधून पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत