डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; जीवितहानी नाही

डोंबिवली : किशोर गावडे (प्रतिनिधी)

आज २९ ऑक्टोबर २०२० रोजी पहाटे पावणे ५ वाजताच्या सुमारास कोपर गाव, चारू भामा म्हात्रे शाळे जवळ, डोंबिवली येथे मैना ‘व्ही २’ (तळ+दोन मजली / एकूण १८ रूम) ह्या धोकादायक इमारतीचा भाग कोसळला. मात्र सदर घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सध्या घटनास्थळी डोंबिवली अ. केंद्राचे १ वाहन व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित असून उर्वरित इमारत तोडण्याचे काम सुरु आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत