डोंबिवलीत व्हाट्सअॅपवर पाठवलेल्य मेसेज वरून वाद ;एकाची हत्या ३ गंभीर

डोंबिवली : रायगड माझा वृत्त 

डोंबिवलीत व्हाट्सअॅपवर पाठवलेल्या मेसेज वरून तरुणांच्या दोन  गटातील वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. यातून झालेल्या सशस्त्र हल्ल्यात कुंदन जोशी नावाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे.

डोंबिवली पश्चिमेच्या जुनी डोंबिवली सखाराम नगर परिसरात राहणाऱ्या सौरव मोहिते या तरूणाने त्याच परिसरात राहणाऱ्या अशोक सिंग याला व्हाट्सअॅपवर प्ले बॉय कंपनी मध्ये नोकरी देत असल्याचा मेसेज पाठवत हिणवलं होतं. अशोक सिंगने या  मेसेज बाबत आपल्या ग्रुप मधील मित्रांना माहिती दिली. शनिवारी अशोकने या मेसेज बाबत सौरवला जाब विचारला होता, त्यामुळे घाबरलेल्या सौरवने झालेला प्रकार आपल्या मित्रांना सांगितला.

रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मेसेज वरून पुन्हा अशोक व सौरवच्या गटात वाद झाला. दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत कुंदन जोशीचा जागीच मृत्यू झाला तर, मुकेश जोशी, निलेश तागारी, नंदू पवार हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार जणांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत