डोंबिवली: डॉमिनोज पिझ्झा सेंटरला भीषण आग

डोंबिवली : रायगड माझा वृत्त 

डोंबिवलीतील डॉमिनोझ पिझ्झा सेंटरला भीषण आग लागल्याची घटना काही वेळापूर्वीच घडली आहे. डोंबिवलीतील मानपाडा रोडवर असलेल्या पिझ्झा सेंटरला ही आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. ही आग नेमकी का लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. काळ्या धुराचे लोट परिसरात पसरले आहेत. याच भागात आयकॉन हॉस्पिटल नावाचे हॉस्पिटलही आहे. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. गॅसचा वास येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. तसेच दुकानातून फटाक्यांसारखे आवाज येत असल्याचीही माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत