तजिंदरपाल ठरला चॅम्पियन; गाेळाफेकमध्ये भारताला सुवर्ण, स्क्वॅशमध्ये तीन कांस्यपदके

रायगड माझा वृत्त 

जकार्ता – गतवेळचा राैप्यपदक विजेता गाेळाफेकपटू तजिंदरपाल तुर अाता शनिवारी १८ व्या एशियन गेम्समध्ये चॅम्पियन ठरला. त्याने पुरुषांच्या गाेळाफेक प्रकारामध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. यासह भारताच्या नावे अाता सातव्या दिवसअखेर सातव्या सुवर्णपदकाची नाेंद झाली. तसेच दीपिका पल्लीकलसह जाेश्ना चिनप्पा अाणि साैरभ घाेषालने सरस खेळी करताना स्क्वॅशमध्ये एकाच दिवशी अापापल्या गटात संघाला प्रत्येकी एक कांस्यपदक मिळवून दिले. यासह भारताने एकूण चार पदकांची कमाई केली. यामध्ये एका सुवर्णसह तीन कांस्यपदकांचा समावेश अाहे.

अातापर्यंत भारताला स्पर्धेतून एकूण २९ पदकांची कमाई करता अाली. यामध्ये ७ सुवर्ण, ५ राैप्य अाणि १७ कांस्यपदके अाहेत. अाज रविवारीही भारताला पदकांची संधी अाहे. अॅथलेटिक्समध्ये दुती चंद, माे. अनस, राजीव अकाेरियाने अापापल्या गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच बॅडमिंटनपटू माजी नंबर वन सायना नेहवाल, सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला. त्यांनाही पदकाची संधी अाहे. याशिवाय भारतीय संघाने प्रथमच ब्रीज प्रकारामधील अापली दाेन पदकेही निश्चित केली. त्यामुळे यंदा भारताला पदकाचे अर्धशतक साजरे करण्याची संधी अाहे.

तजिंदरचे दुसरे पदक; राैप्यनंतर अाता सुवर्ण

भारताच्या २३ वर्षीय तजिंदरपालचे या स्पर्धेतील हे सलग दुसरे पदक ठरले. त्याने यापूर्वी गत स्पर्धेत राैप्यपदक पटकावले हाेतेे. त्यादरम्यान त्याचे साेनेरी यशाचे स्वप्न भंगले हाेते. हीच उणीव अाता त्याने भरून काढली. चार वर्षांतील प्रचंड मेहनतीच्या बळावर त्याने यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याने २०.७५ मीटरची गाेळाफेक केली. यातून त्याला अव्वल स्थान गाठता अाले. त्यामुळे ताे किताबाचा मानकरी ठरला. त्याने पाचव्या प्रयत्नात हा साेनेरी यशाचा पल्ला गाठला. नाैसेना दलातील तजिंदरपालला पहिल्या प्रयत्नात अव्वल कामगिरी करताना १९.९६ मीटरचे अंतर गाठता अाले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात त्याची कामगिरी घसरली. तिसऱ्या प्रयत्नात ताे फाऊल झाला. त्याने पाचव्या प्रयत्नात २०.७५ मीटरपर्यंत गाेळाफेक करून सुवर्ण निश्चित केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत