तटकरेंना राणेंची साथ!

स्वाभिमान पक्षाचा अनिकेत तटकरे यांना पाठींबा!

सिंधुदुर्ग : रायगड माझा वृत्त 

कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य मतदार संघासाठी येत्या 21 मे रोजी मतदान होत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाची सिंधुदुर्गातील मतदारांची मते  मिळण्याची शक्‍यता आहे.

स्वाभीमान पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ओसरगाव येथे आज खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आमदार नितेश राणे होते. विधान परिषदेच्या कोकण मतदार संघातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गती मतदार मतदान करणार आहेत. यंदा आघाडी विरूद्ध युती अशी दुरंगी लढत होत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्या दुरंगी लढत आहेत. कोकणातील तीनही जिल्हात 941 मतदार असले तरी सिंधुदुर्गातील 212 मतदार निर्णाय ठरणार आहेत यात राणेंच्या  स्वाभीमान पक्षासोबत असलेले कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून  आलेले  80 आणि कणकवली नगरपंचायतीतील 10 असे 90 मतदार राणें सांगतील त्यालाच मतदान करणार आहेत. त्यामुळे आज ओसरगाव येथे स्वाभीमानची गुप्त बैठक झाली. यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे  सभापती, नगरपालीका आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी  हजेरी लावली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही बैठक घेण्यात आली यात राणेंनी आपल्या सदस्यांना  काही कानमंत्र दिल्याचे समजते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत