तटकरे पुन्हा माझ्या विरोधात निवडणूक लढविण्याची हिम्मत करणार नाही : अनंत गीते

रोहे : महादेव सरसंबे

रोह्यात पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेना अकराशे पैकी किमान 700 मते घेणार यात कोणती ही दुमत नाही. आज मला या कार्यक्रमात गदा भेट देण्यात आली आहे. मी आज कोणाचे ही नाव घेणार नाही. परंतु गदा उचलण्यापुर्वीच आगामी निवडणुकीत विरोधक गारद झालेला असेल एवढे नक्की! शिवसेना यापुढे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यामुळे यापुढे सर्व आमदार हे शिवसेनेचे असतील खासदारही शिवसेनेचा असेल. आज मी तुम्हाला ठोकून आणि दाव्यानिशी सांगतो. सुनील तटकरे पुन्हा माझ्या विरोधात निवडणूक लढविण्याची हिम्मत करणार नाही.,सुनील तटकरेला पडायची हौस असेल तर त्यांनी निवडणुक लढवावी असे केंद्रिय अवजड उद्योगमंत्री ना.अनंत गीते यांनी पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारानिमित्त रोह्यातील भाटे सार्वजनिक वाचनालयाच्या सभागॄहात आयोजीत सभेत शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

यावेळी व्यासपिठावर शिवसेना संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, विलास चावरे, जिल्हा परिषदेचे  विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे,  जिल्हा परीशादेचे सदस्य किशोर जैन, जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले, शिवसेना तालुका प्रमुख समिर शेडगे, अनिल नवगणे, प्रशांत मिसाळ, संजीव जोशी, अॅड मनोज शिंदे, शहर प्रमुख दिपक तेंडुलकर, अल्पसंख्याक विभाग प्रमुख उस्मानभार्इ रोहेकर, कोळी  समाज रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत पोकळे, उपतालुका प्रमुख महादेव साळवी, नगरसेविका समिक्षा बामणे, पंचायत समिती सदस्या चेतना लोखंडे, संजय भोसले, शिवसेना महीला आघाडी संघटक निता हजारे, कामगार सेल अध्यक्ष अॅड. हर्षद साळवी, विभाग प्रमुख उध्देश वाडकर, सचिन फुलारे, नितीन वारंगे, संतोष खेरटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद थरवळ यांनी रोह्यात शिवसेनेची ताकत वाढली आहे. त्यामुळे आगामी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची निवडणुक शिवसेना जिंकेल असे सांगितले. तालुकाप्रमुख समिर शेडगे यांनी पदवीधर मतदार संघातील भाजप उमेदवारा बददल सुनील तटकरे काही बोलत नाही. नजीब मुल्ला याला पाडण्यासाठी राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याचे सांगितले. जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले यांनी शिवसेनेची ताकत वाढली आहे. चांगली ताकत पदवीधर मतदार संघात आहे. यापुढे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा विजय होणार आहे. उस्मान रोहेकर यांनी राष्ट्रवादी पक्षाला मुस्लीम समाजाचा एवढा प्रेम असेल तर श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात मुस्लीम उमेदवार द्या. आज रोह्यात 25 टक्के मुस्लीम समाज शिवसेनेच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.