तणावांनी व्यथित झाल्याने आयुष्य संपवतोय.. भय्यूजी महाराजांची सुसाइड नोट

इंदूर  :  रायगड माझा

आयुष्यातील ताणतणावांनी मी व्यथित झालो आहे.. माझ्या आत्महत्येस कोणालाच जबाबदार धरू नये, असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी आज (मंगळवार) दुपारी स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आयुष्यातील ताणतणाव सहन करण्याच्या पलीकडे गेले असल्यामुळे आपण आत्महत्या करत असून आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे भय्यूजी महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. भय्यूजी महाराज यांनी ही सुसाईड नोट इंग्रजीमध्ये लिहिली आहे

कोणीतरी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आयुष्यातील ताणतणावांनी मी व्यथित झालो आहे.. माझ्या आत्महत्येस कोणालाच जबाबदार धरू नये, असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केली त्यावेळी घरात त्यांच्या पत्नी आणि आईही होत्या. भय्यूजी महाराज यांनी एका खोलीत स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळी झाडल्याचा आवाज येताच त्यांच्या अनुयायांनी खोलीकडे धाव घेतली. परंतु, खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी भय्यूजी महाराज हे जखमी अवस्थेत होते. त्यांना त्वरीत इंदूर येथील बॉम्बे रूग्णालयात हलवण्यात आले. त्याचदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत