तनुश्री दत्ताच्या आरोपाला नाना पाटेकरांनी दिलं प्रत्युत्तर

मुंबई : रायगड माझा वृत्त

बाॅलिवूडचे अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर ‘आशिक बनाया आपने’ फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2008साली विनयभंगाचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणानंतर तनुश्रीने न्यूज 18 सोबत खास बातचीत केली. यावेळी तिने आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. यावर मिरर नाऊशी बोलताना अभिनेते नाना पाटेकरांनी सगळे आपल्यावरचे सगळे आरोप धुडकावून लावलेत. ते म्हणाले, ‘तुम्हीच सांगा एका व्यक्तीच्या बोलण्यावर मी काय करणार? लैंगिक अत्याचारचा अर्थ काय?’

तनुश्री दत्ताच्या आरोपाला नाना पाटेकरांनी दिलं प्रत्युत्तर

2008 मध्ये ‘हाॅर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरव्यवहार केला होता. मी त्यांना विरोध केला. पण त्यांनी याचा बदला घेण्यासाठी संपूर्ण चित्रपटात मला त्रास दिला, असा दावा तनुश्री दत्तानं केला होता. यावर ते म्हणाले, ‘आम्ही दोघं सेटवर होतो आणि त्यावेळी आमच्या समोर 200 जण होते. मी काय बोलू यावर?’

नाना कायदेशीर कारवाई करणार का, यावर ते म्हणाले, ‘ मी बघतोय, कायदेशीरपणे काय करता येईल ते.’

पुढे नाना पाटेकर म्हणाले, ‘ मी आयुष्यात जे काम करतो, तेच पुढे करत राहणार.’

तनुश्री दत्ता म्हणाली होती, ‘नाना एवढ्यावर थांबले नाही. तर त्यांनी माझ्या कुटुंबालाही त्रास दिला. शुटिंगच्या नंतर मी घरी निघाले तेव्हा त्यांनी गाडीवर दगडफेक केली होती असा आरोपही तनुश्रीने केला. तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. त्या दिवशी सेटवर तणावपूर्ण वातावरण होतं.’

‘मी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते पण माझी तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. उलट माझ्याच विरोधात उलटी तक्रार दाखल करण्यात आली होती असंही तिने सांगितलं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत