तब्बल १४०० किलो वजनाची धष्टपुष्ट गाय, उंची ऐकून व्हाल थक्क

ऑस्ट्रेलिया : रायगड माझा ऑनलाईन 

गायीवरून भारतामध्ये राजकीय चर्चेला उधाण येते, पण ऑस्ट्रेलियामधील एक गाय सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या गायीची उंची आणि वजनाने जगभरातील लोक हैराण झाले आहे. सरासरी माणसाचे वजन सहा फूट राहते. पण या गायीचे वजन सहा फूटांपेक्षा जास्त आणि वजन एक टनापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ही गाय सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर नेटीझन्स मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

ऑस्ट्रेलियातील या धष्टपुष्ट गायीची उंची सहा फूट चार इंच आहे. तर वजन १४०० किलो. या गायीचे नाव Knickers असे आहे. सात वर्षाच्या Knickers ची किंमत ३९६ ऑस्ट्रेलियन (२० हजार रूपये) डॉलर आहे. गायीची उंची जास्त असल्यामुळे त्यांचे आयुर्मान वाढते असे म्हटले जाते. सोशल मीडियावर ही गाय सध्या चर्चेचा विषय आहे. या आधी इटलीमधील एक गाय अशीच चर्चेत होती.

‘सोशल मीडियावर व्हायरल होणारा Knickers चा फोटो एक वर्षभरापूर्वीचा आहे. Knickersला मी तीन वर्षाची असताना विकत घेतले होते. सध्या Knickersचे वय सात वर्ष आहे. उंची जास्त असल्यामुळे Knickersचे आयुष्य इतर गायीच्या तुलनेत आधीक असू शकते, अशी माहिती गायीच्या मालकाने the New York Times ला दिली. ‘

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत