तब्बल 47 दिवस पूर्ण होऊनही 11 वी प्रवेश प्रक्रिया आरक्षणाच्या कचाट्यात

भांडुप : किशोर गावडे (प्रतिनिधी)

मागील दोन महिन्यापासून मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगिती मुळे थांबलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आता पुन्हा महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर काहीतरी निर्णय होईल आणि प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, 9 सप्टेंबर रोजी दुसऱ्या गुणवत्ता यादीला स्थगिती मिळाल्यानंतर अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश कधी मिळणार ? या प्रश्नांची उत्तरे सापडली नसल्याने ते तणावाखाली आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीचा निकाल नेहमीप्रमाणे उशिराने जाहीर झाला. आणि त्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. अकरावी प्रवेशांमध्ये एकूण जागांच्या 12% टक्के जागांवर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र, मराठा (एस .ई. बी. सी) आरक्षणाला सर्वोच्च न्यायालया कडून मिळालेल्या स्थगिती नंतर दुसऱ्या फेरीपासून पुढील प्रक्रिया स्थगिती केली होती. आता तब्बल 47 दिवस उलटून गेलेले असताना अद्याप पर्यंत ही प्रक्रिया सुरळीत झालेली नाही.

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम अत्यंत महत्वाचा समजला जातो. विज्ञान शाखेत तर इयत्ता अकरावी आणि बारावीच्या शिक्षणक्रमावर आधारित विविध पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांचा अभ्यासक्रम असतो. असे असताना संपूर्ण प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू करायचा की नाही असा पेच महाविद्यालयांपुढे उभा राहिलेला आहे. मात्र, मर्यादित वेळेत पुढिल शिक्षणक्रम पूर्ण करणे कठीणच होणार असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत