तब्‍बल 2 तासानंतर अमित शहा- उद्धव ठाकरे यांच्‍यातील मॅरेथॉन बैठक संपली, चर्चेबाबत उत्‍सुकता

मुंबई :रायगड माझा 

 तब्‍बल 2 तासानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍यातील मातोश्रीवरील बैठक संपली आहे. नियोजित वेळेपेक्षा ही बैठक दीड तास्‍त जास्‍त चालली. बैठकीत नेमक्‍या कोणत्‍या मुद्द्यावर चर्चा झाली तसेच चर्चेतून काय निष्‍पण्‍ण झालं? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. बैठक संपल्‍यानंतर उद्धव ठाकरे अमित शहा यांना सोडण्‍यासाठी मातोश्रीबाहेरदेखील आले होते. दोघांनीही एकमेकांना स्मित देत हास्‍तालांदोन केले. दोघांची देहबोली यावेळी आश्‍वासक वाटत होती. त्‍यामुळे चर्चा सकारात्‍क झाली असावी, असा कयास राजकीय तज्ञांकडून व्‍यक्‍त केला जात आहे. शिवसेनेच्‍या ‘एकला चलो रे’ या भुमिकेविषयी उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेणार, हे पाहणे आताऔत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.

तत्‍पूर्वी ‘मातोश्री’वर आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी अमित शहा यांचे स्वागत केले. अमित शहांसमवेत फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अमित शहा यांना मातोश्रीवर खास गुजराती पदार्थाची मेजवानी पेश केली. शहांचा गुजराती पद्धतीने पाहुणचार करताना ढोकळा, फाफडा, खांडवी आदी पदार्थांचा समावेश होता. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौघेच हजर होते. शिवसेनेचाही इतर कोणताही नेता या बैठकीला हजर नव्हता. सुरूवातीला अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर शहा, उद्धव यांच्यासमवेत फडणवीस-आदित्य सहभागी झाल्याचे सांगणयात आले. ही बैठक तब्बल दोन तास चालली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत