तरुणाईला आकर्षित करण्यासाठी खालापूरात राजकीय पक्षाचा नवनवे फंडे, विविध स्पर्धाचे केले जाते आयोजन

खोपोली : समाधान दिसले

खालापूर तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका जसजस्या जवळ येवू लागल्या आहेत. तसे तालुक्यातील राजकीय पर्व दिवसेंदिवस अधिकच तापू लागले आहे. यातच आरोप-प्रत्यारोपाचे समीकरण वाढू लागल्याने सर्वच मातब्बर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळीनी राजकीय पक्ष, संघटना वाढीवर भर दिला आहे. त्यातच निवडणूकाच्या काळात तरुणाईला आपल्या राजकीय पक्षाच्या प्रवाहाकडे आकर्षित करण्यासाठी नेते मंडळीची पाऊले पुढे सरसावली असून यामध्ये तरुणाईला आपल्या राजकीय पक्षाच्या प्रवाहात आकर्षित करण्यासाठी क्रिकेटचे भव्य दिव्य सामने, कबड्डी, शरीर सौष्ठव अशा अन्य विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करीत तरुणाईला प्रोत्साहीत करण्याकरिता वेगवेगळे नवनवे फंडे राजकीय नेते करीत असल्याचे चित्र सध्या खालापूरात पाहायला मिळत असले तरी याचा कितपत फायदा कोणत्या राजकीय पक्षाला मिळेल हे येणारी निवडणूकच कळेल.

खालापूर तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, शेकाप, मनसे, कॉग्रेस, भारीप, बीआरएसपी, स्वाभिमान व अन्य राजकीय पक्ष हे मातब्बर असल्याने तालुक्यातील आपल्या पक्षाची प्रतिष्ठा आगामी काळात होणाऱ्या निवडणुकामध्ये राखण्यासाठी प्रत्येक राजकीय नेते आपआपली प्रतिष्ठापणाला लावताना दिसत आहेत. तालुक्यातील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राजकीय पक्ष चांगलेच मोर्चेबांधणीला लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  सध्या खालापूरातील राजकीय पर्वातील आरोप-प्रत्यारोपाचे समीकरण अधिकच वाढू लागले असून त्यातच नव तरुणाईला आपल्या राजकीय पक्षाच्या प्रवाहात आकर्षित करण्याकरिता सर्वच राजकीय पक्ष व पक्षातील नेते वर्ग स्वतःचे वाढदिवस, पक्षश्रेष्ठी तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवनवीन फंडाचा अवलंब करीत असून यामध्ये शरीर सौष्ठव स्पर्धा, बेंच प्रेस स्पर्धा, क्रिकेट सामने, कबड्डी स्पर्धा अशा अन्य विविध स्पर्धाचे आयोजन करीत या स्पर्धाच्या माध्यमातून तरुणाईवर भुरळ पडण्यात खालापूरातील राजकीय कार्यकर्ते एक पुढे सरसावल्याने राजकीय वातावरण तेजीत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

तर या स्पर्धाच्या आयोजनातून कोणत्या पक्षाला कितपत फायदा होईल हे येणारी निवडणूकीत मध्ये कळेल यात तीळ मात्र शंका नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत