तरुणीवर हल्ला करून तरुणाचे स्वतःवर वार

मुंबई : रायगड माझा वृत्त

बुधवारी दुपारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ओंकारेश्वर ब्रिजजवळ तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या तरुणीसोबत असलेल्या तरुणानेच तिच्यावर हल्ला केला असून त्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून घेतले आहेत. दोघांवरही शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पीडित तरुणी आणि हल्ला करणारा तरुण पूर्वी वाळकेश्वर परिसरात राहत होते. त्या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते. त्यानंतर ही तरुणी भाईंदर येथे राहण्यास गेली. बुधवारी दुपारी हे दोघेही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे भेटले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर तरुणाने तिच्यावर हल्ला केला. यात पीडित तरुणी जखमी झाली. मग तरुणाने स्वतःवरही वार केले. कस्तुरबा मार्ग पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असून तरुणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच तरुणाला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत