…तर अशांनी आमची कोवॅक्सीन लस घेऊ नये; भारत बायोटेकनेच दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

Do not take Covaxin if Bharat Biotech warns people with medical conditions  not to get vaccinated | …तर अशा व्यक्तींनी आमची कोवॅक्सीन लस घेऊ नये; 'भारत  बायोटेक'नेचं केलं आवाहन | Loksatta

16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात कोरोनाविरोधात लसीकरण सुरु झालं आहे. या लसीला ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआयने आप्ताकालीन वापरासाठी परवानगी दिल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केल्याचं पहायला मिळालं. या लसीची सुरक्षा, दर्जा, परिणामकारकता आणि माहिती यासंदर्भातील पारदर्शकतेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याचदरम्यान आता भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या कृष्णा एल्ला यांनी कोवॅक्सीन ही २०० टक्के सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. आम्हाला लस बनवण्याचा अनुभव असून आम्ही सर्व वैज्ञानिकांचे सल्ले गांभीर्याने घेतो, असंही कृष्णा म्हणाले होते. दरम्यान भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन वादात सापडली असून, तिसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिनच्या चाचण्यांना पाहता कंपनीनं लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे.

ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ते जे औषध घेत आहेत ते प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे असेल तर कोव्हॅक्सिन लस टोचून घेऊ नये, असं कंपनीनं म्हटलं आहे. तसंच ब्लिडिंग डिसऑर्डर असलेल्या लोकांनादेखील लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक गंभीर स्वरुपात आजारी आहेत, ताप आहे किंवा त्यांना कोणत्याही अॅलर्जीचा इतिहास आहे, गर्भवती किंवा स्तनदा माता यांनी लसीपासून दूर रहावे, असंही कंपनीने म्हटलं आहे.

याआधी सरकारनं सांगितलं होते की, ‘प्रतिकारशक्ती कमी असलेले व्यक्तीदेखील लस घेऊ शकतात. तेव्हा असा समज होता, की अशा लोकांमध्ये ही लस कमी प्रभावी असेल. किमोथेरपी, एड्स झालेले आणि स्टेरॉईड घेत असलेले लोक या श्रेणीमध्ये मोडतात. या लोकांना कोरोनाचे संक्रमण वेगाने होऊ शकते. परंतू त्यांच्यावर या लसी काम करत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत