…तर ‘एक्स्प्रेस वे’वर 1 हजार रुपये टोल!

मुंबई : रायगड माझा 

 

प्रस्तावित खोपोली-कुसगाव बायपास रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी)मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलची मुदत सन 2030 वरुन 2045 पर्यंत वाढवली आहे.

वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, खोपोली ते कुसगाव दरम्यान प्रस्तावित बायपास रस्त्याचे कर्ज फेडण्यासाठी टोल संकलनाची मुदत 15 वर्षांनी वाढवण्यात आली असून टोल दरात प्रत्येक तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्यात येईल. सध्या मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवरुन कारने प्रवास करणार्‍यास टोलपोटी 230 रुपये मोजावे लागतात.

दर तीन वर्षांनी यात 18 टक्के वाढ केल्यास भविष्यात एका वनवे ट्रीपसाठी कारला 1 हजार रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. याबाबत 24 नोव्हेंबर 2017 च्या ठरावानुसार, खालापूर टोल नाका ते कुसगाव दरम्यानच्या बायपास रस्त्यामुळे 20 मिनिटांचा प्रवास कमी होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत