‘…तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती’ ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार याचं मोठं वक्तव्य

राजस्व राज्यमंत्री अब्दुल सत्तार भी कोरोना संक्रमित हुए, पॉजिटिव होने वाले  राज्य के पांचवें मंत्री

महाराष्ट्र News 24
मी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती, असं सिल्लोड तालुक्यात एकहाती वर्चस्व असलेले आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तारांच्या या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अब्दुल सत्तार यांनी आपल्या शिवसेना प्रवेशाचे समर्थन केलं आहे. नंदुरबारमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
राजकीय आयुष्यात अनेक राजकीय निर्णय चुकत असतात, तसाच माझा हा निर्णय चुकला असता तर ही माझी राजकीय आत्महत्या ठरली असल्याचं सत्तार म्हणाले. काही दिवसांमागे सत्तारांनी विधान परिषदेचा निकाल लागल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाण साधला होता.
चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करू. इतकेच नव्हे तर मोदी साहेबांनाही हिमालयाची खूप माहिती आहे. त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवं, असं सत्तार म्हणाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत