…तर तो कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला माफी नाही : अजित पवार

महाराष्ट्र News 24

जर कोणी बेकायदा सावकारीतून सर्वसामान्यांचे आर्थिक पिळवणूक करून दादागिरी करत असतील तर अशा लोकांवर मोक्का अथवा तडीपारीची कारवाई केली जाईल. उद्या जर माफी मागायला कुणी मायेचा लाल जरी आला तरी त्याला माफ करणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक इशारा दिला.बारामती सहकारी बँकेच्या समारंभ सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या जाहीरपणे इशारा दिला आहे.बारामती शहर व तालुका प्रत्येक घटकाला आपला तालुका वाटावा यासाठी सर्वांगीण विकासासाठी अनेक कामे हाती घेतली आहेत. मध्यंतरीच्या काळात प्रीतम शहा यांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली.  जर  कोणाचे नातेवाईक किंवा मित्र बेकायदा सावकारी करत असतील तर त्यांना आताच सावध करा परत चुकून झालं, दादा माफ करा असं म्हणत कोणी मायेचा लाल आला तरी  माफ करणार नाही, अशा इशारा अजितदादांनी दिला.जर कोणी बेकायदा सावकारीतून सर्वसामान्यांचे आर्थिक पिळवणूक करून दादागिरी करत असतील तर अशा लोकांवर मोक्का अथवा तडीपारीची कारवाई केली जाईल, असा दमच अजित पवार यांनी दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत