…तर पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील !

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

कांजूर मेट्रो कारशेडवरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद सुरु आहे. भाजपने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.महाराष्ट्रातील शिवसेना हा देशात अजिंक्य असा पक्ष आहे म्हणूनच आम्ही 105 आमदार घरी बसवले असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विक्रोळीमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

इतकंच नाही तर काहीही करा मेट्रोची कारशेड कांजूरलाच होणार आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालो आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातली शिवसेना देशात अजिंक्य असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.दरम्यान, भाजपचे यावेळी 105 आमदार आहेत तर पुढच्या विधावसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील, असा विश्वसही राऊतांनी बोलताना व्यक्त केला. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत