…तर मी रस्त्यावर उतरणार – खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती

रायगड : रायगड माझा 

दिल्ली दरबारी शिक्षण, उद्योग व सहकार सम्राट गेले. त्यांनी तेथे शिवजयंती साजरी का केली नाही? केवळ भाषणात त्यांचे नाव घेऊन चालणार नाही असे म्हणत मला कोरेगाव-भीमा घटनेबद्दल खंत वाटते. शिवरायांच्या कर्मभूमीत हे घडतेच कसे? ही भूमी शिवराय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीत काही अनुचित घडत असेल तर मी रस्त्यावर उतरणार, असे प्रतिपादन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

संभाजीराजे म्हणाले, राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या रायगडमुळेच मला ताकद मिळाली असून दिल्लीत माझ्यासाठी संभाजीराजे छत्रपती म्हणून नव्हे तर शिवछत्रपतींचा वंशज असल्याने रेड कार्पेट टाकले जाते, असे सांगत पुढील शिवराज्याभिषेकासाठी डच, इंग्लंड व फ्रान्सच्या भारतीय राजदूतांना रायगडावर आमंत्रित करून शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे त्यांना दर्शन घडवणार आहे.

दिल्ली दरबारी शिक्षण, उद्योग व सहकार सम्राट गेले. त्यांनी तेथे शिवजयंती साजरी का केली नाही? मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठक घ्यावी, अशी माझी सूचना आहे. त्याचवेळी मंत्र्यांना शिवरायांच्या कर्तृत्वाची कल्पना सर्वांना येईल. केवळ भाषणात त्यांचे नाव घेऊन चालणार नाही. मला कोरेगाव-भीमा घटनेबद्दल खंत वाटते. शिवरायांच्या कर्मभूमीत हे घडतेच कसे? ही भूमी शिवराय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीत काही अनुचित घडत असेल तर मी रस्त्यावर उतरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत