…तर शपथ घेणारा पहिला मंत्री माळी समाजाचा – पंकजा मुंडे

बीड - येथे गुरुवारी झालेल्या माळी समाज मेळाव्यात पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांचा भाजीची टोपली आणि विळा देऊन सत्कार करताना पदाधिकारी.

बीड : रायगड माझा वृत्त

भाजपमधून देवयानी फरांदे, अतुल सावे, योगेश टिळेकर, मनीषा चौधरी, भीमराव धोंडे हे माळी समाजाचे नेते आमदार म्हणून निवडून आले.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर शपथ घेणारा पहिला मंत्री माळी समाजाचा असेल, अशी ग्वाही ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.सावता परिषदेचे चौथे त्रैवार्षिक अधिवेशन आणि माळी समाज मेळावा गुरुवारी (ता. ३१) येथे झाला. परिषदेसह समाजाला सरकारचे पाठबळ मिळत नाही, अरण तीर्थक्षेत्र विकासाला भरीव निधी मिळत नाही, अशी खंत व्यक्त करून संतोष राजगुरू, राजीव उबाळे यांनी हा मेळावा विद्रोही असून वेळप्रसंगी सरकार पाडू असा उल्लेख भाषणात केला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात मंत्रिपदाचे आश्‍वासन दिले. ‘अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी ग्रामविकास विभागाद्वारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तुम्ही हवा तेवढा आकडा सांगा, तेवढा निधी दिल्याशिवाय संत सावता महाराजांच्या अरण तीर्थक्षेत्राकडे येणार नाही. विकासकामे करण्यासाठी देवस्थानकडे जागाच नाही. शासनाने ती खरेदी करून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे’ असे मुंडे म्हणाल्या. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, रमेश महाराज वसेकर, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, आदी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत