तळोजा एमआयडीसीमध्ये स्फोट, कल्याणजवळच्या १४ गावांमध्ये हादरे

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त 

तळोजा एमआयडीसीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत झालेल्या स्फोटात दोन कामगार जखमी झाले आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खड्डा खोदताना हा स्फोट झाल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. स्फोटाचं नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.

जखमी झालेले दोन्ही कामगार जेसीबी चालवणारे होते. स्फोटाची तीव्रता इतकी होती की कल्याणजवळच्या १४ गावांमध्ये या स्फोटाचे हादरे जाणवले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत