तांत्रिकी अडथळे दूर करून आज चांद्रयान-२ घेणार अंतराळात भरारी

श्रीहरीकोटा : रायगड माझा वृत्त 

भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहिमेअंतर्गत चांद्रयान-२चे आज जीएसएलव्ही-एमके३-एम१ या शक्तिशाली रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेत भारताचे एकच उद्दिष्ट आहे. ते म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रृवाजवळील भागाचा अभ्यास करणे. तांत्रिक अडथळ्यामुळे उड्डाणाच्या केवळ ५६ मिनिटे आधी गेल्या आठवड्यात प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते.

‘इस्रो’ने चांद्रयानाचे उड्डाण गेल्या आठवड्यात रद्द केल्यानंतर ताबडतोब शास्त्रज्ञांनी त्यातील तांत्रिक अडचण दूर केली. दुरुस्ती नंतर आज यानाचे उड्डाण होणार असल्याचे तीन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले आहे. आज दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चेन्नईपासून १०० किमीवर असलेल्या सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रक्षेपण तळावरून या चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत