तानाजीबुवा मसणे यांचा गुरुपूजन सोहळा उत्साहात

भजनाची 40 वर्षाची परंपरा कायम; घडविले शेकडो शिष्य

नेरळ-  कांता हाबळे
कर्जत तालुक्यतील तळवडे गावातील भजनी कलावंत भजनभूषण तानाजीबुवा मसणे यांचा गुरू पूजन सोहळा रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी नेरळ येथील आगरी समाज सामाजिक सभागृहात पार पडला. यावेळी त्यांच्या शिष्यांनी गुरुचे पूजन करून अनेक अभंग सादर केले. शिष्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
      तानाजी बुवा मसणे हे नेरळ जवळलील तळवडे गावात राहत असून 1970 मध्ये त्यांनी भजन गाण्यास सुरुवात केली. 40 वर्षाहून अधिक वर्ष त्यांनी आपली भजनाची परंपरा कायम ठेवली आहे. आज त्यांच्या कडून शेकडो शिष्य तयार झाले आहेत. त्यांच्यावर असलेले प्रेम त्यांच्या गुरू पूजन सोहळ्यात दिसून आले, आतापर्यंत त्यांच्या दोन ऑडिओ कॅसेट प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी रायगड, ठाणे, मुरबाड या तालुक्यात आपले शिष्य घडविले आहेत. कोणतीही पदवी नसताना शेकडो शिष्य घडविणे ही त्यांची कलाम सर्वांनाच हेवा वाटणारी आहे.
      गुरुवर्य तानाजीबुवा मसणे यांच्या शिष्यगण दरवर्षी गुरुपूजन सोहळ्याचे आयोजन करतात. यावर्षी या गुरुपूजन सोहळ्याचे आयोजन नेरळ आगरी समाज सामाजिक सभागृहात करण्यात आले होते. दीपप्रज्वलन आणि वाद्य पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व शिष्यगणांनी गुरुचे पूजन करून आशीर्वाद घेतला त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला,
त्यानंतर अनेक मान्यवरांनी तानाजी बुवा मसणे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि गुरुंविषयी असलेला आदर या निमित्ताने या रावगावात गुरुपौर्णिमा कार्यक्रमात पाहायला मिळाला. यावेळी अनेक मान्यवर, भजनी कलावंत, व शिष्य उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत