‘तान्हाजी’ जगभरातील भाषांमध्ये डब करून प्रदर्शित व्हावा : मनसे

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

चित्रपट ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’चा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. याची दखल राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील घेतली आहे.  ‘हिंदी चित्रपट मराठी भाषेत डब करून प्रदर्शित करण्याला मनसेचा विरोध आहेच, परंतु तान्हाजी हा चित्रपट जगभरातील भाषांमध्ये डब करून प्रदर्शित व्हावा.’ असे मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट केले आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या निमित्ताने आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निधड्या मावळ्यांचा पराक्रम जग पाहील. दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता अजय देवगन यांचे अभिनंदन.”असे ट्विट करत अजय देवग्च्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाला मराठीमध्ये डब करण्याची परवानगी दिली आहे. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अजयने दमदार अभिनय केला आहे.  या चित्रपटाच्या ट्रेलरवर लोकांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. या ट्रेलरमुळे अजयवरदेखील अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत