‘तारक मेहता…’मध्ये डॉ. हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचं निधन

हसमुख आणि मनमिळावू स्वभावाच्या कवी कुमार आझाद यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

Image result for Dr haathi photos

मुंबई : सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत त्यांचा मृत्यू झाला. कवी कुमार आझाद अनेक वर्षांपासून या मालिकेत काम करत होते.

मागील तीन दिवसांपासून कवी कुमार आझाद यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना मुंबईतील मीरा रोड इथल्या वोकहार्ड्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

हसमुख आणि मनमिळावू स्वभावाच्या कवी कुमार आझाद यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर फिल्म सिटीमध्ये सुरु असलेलं चित्रीकरण रद्द करण्यात आलं आहे.

कवी कुमार आझाद यांनी 2010 मध्ये शस्त्रक्रिया करुन 80 किलो वजन कमी केलं होतं. ‘तारक मेहका का उल्टा चश्मा’ मालिकेमुळे कवी कुमार आझाद घराघरात पोहोचले होते. तसंच आमीर खानच्या ‘मेला’ आणि फंटूश यासह काही सिनेमातही काम केलं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत