तिलारी प्रकल्पातील पाण्याच्या वापरासाठी पंधरा दिवसात सूक्ष्म सिंचनचा आराखडा सादर करा – दिपक केसरकर

रायगड माझा वृत्त 

मुंबई: तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात सूक्ष्म जल सिंचन प्रकल्प राबविण्यासाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा सूक्ष्म सिंचन प्रकल्प राबविण्यासाठी येत्या पंधरा दिवसात आराखडा सादर करण्याचे निर्देश वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

तिलारी प्रकल्पात येणाऱ्या दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यासंदर्भात आज मंत्रालयात श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

श्री. केसरकर म्हणाले, तिलारी प्रकल्प हा आंतरराज्य प्रकल्प असून प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील पाच हजार 600 हेक्टर क्षेत्रात सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प राबविण्यात यावा. यासाठी कृषी विभागाने आराखडा तयार करावा. तसेच या पद्धतीनेच इतर तालुक्यांत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यासाठी आराखडे तयार करून कार्यवाही करावी.

या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता मकरंद मॅकेल, राजेश धागतोडे, जैन सिंचनचे मधुकर फुके आदीबरोबरच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत