तीन पोलिसांचे अपहरण करून अतिरेक्यांनी केली हत्या

श्रीनगर : रायगड माझा वृत्त 

हिजबुल मुजाहिद्दिनच्या दहशतवाद्यांनी गुरुवारी काश्मीरमध्ये तीन पोलिसांना अपहरण करून ठार केल्याने खळबळ उडाली आहे.
शोपियां जिल्ह्यातील तीन विशेष पोलीस अधिकारी व एकाचा भाऊ यांचे गुरुवारी भरदिवसा घरात घुसून कुटुंबीयांसमोरच बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्यात आले होते. त्यापैकी फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग व निसार अहमद धोबी या तिघा अधिकाऱ्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. फय्याज अहमद भाट याची मात्र अतिरेक्यांनी सुटका केली आहे.

Three policemen kidnapped by terrorists | तीन पोलिसांचे अपहरण करून अतिरेक्यांनी केली हत्या

हिजबुलचा कमांडर आणि मोस्ट वाँटेड अतिरेकी रियाझ नायकू याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची सुटका करण्यात यावी, अन्यथा हे प्रकार सुरूच राहतील, असे तो सांगत असल्याचा व्हिडीओच समोर आला. ‘राजीनामा द्या, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील,’ अशा धमकी काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी या पोलीस कर्मचाºयांना दिल्या होत्या. गेल्या महिन्यात अतिरेक्यांनी पोलिसांच्या कुटुंबातील १0 जणांचे अपहरण केले होते. मात्र, त्यांची नंतर सुटका करण्यात आली. (वृत्तसंस्था)
>पाकसोबतची बैठक भारताकडून रद्द
तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूर पद्धतीने केलेली हत्या, तसेच अतिरेकी बुºहान वणी याच्यावर पाकिस्तानने जारी केलेले टपाल तिकीट या गोष्टींतून त्या देशाचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी टीका भारताने केली आहे, तसेच दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमध्ये या महिन्यात होणारी बैठक भारताने रद्द केल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे. अशी बैठक घेण्याची विनंती इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून केली होती. मात्र, ही बैठक रद्द करून भारताने आपल्या कणखर भूमिकेचा प्रत्यय पाकिस्तानला दिला

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत