तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून युवकाचा मृत्यू!

रोहे : महादेव सरसंबे

रोहा तालुक्यातील यशवंतखार येथील अमोल दत्ताराम धुमाळ वय 27 यांचा आज मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास तुटलेल्या वीज वाहीनीचा ( तारेचा) शॉक लागुन मृत्यु झाला आहे.महत्वाचे म्हणजे वीज वाहीनी तुटुन ( तार ) पडल्याचे वीज वितरण अधिका-यांना कळविले असताना ते वेळेवर न आल्याने या तरूणाचा मृत्यु झाला आहे.त्यांना कळविले असताना याचे वीज प्रवाह बंद केला असता तर या तरूणाचा बळी गेला नसता असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

रोहा तालुक्यातील यशवंतखार येथील भैरवनाथाच्या बाजुला दुर्गा या खाजगी फार्म हाऊस वर यशवंतखार येथील अमोल दत्ताराम धुमाळ हे कामाला होते.या फार्म हाऊसवर मंगळवारी पहाटे अथवा सोमवारी रात्री च्या सुमारास वीजेची जीवंत वाहनी तुटली होती.या संबधीत वीज वितरण अधिकारी यांनी याची माहीती दिली होती.परंतु वीज वितरण कार्यालयाने या गोष्टीला गाभिर्याने घेतले नाही.त्यामुळे या ठिकाणी वीजेचा शॅाक लागुन अमोल धुमाळ यांच्या बैलाचा मृत्यु झाला होता.याची त्यांना कल्पना नव्हती तो त्या ठिकाणी आला असताना त्याला ही शॉक लागल्याने त्याचा मृत्यु झाला आहे.शेतकरी व सोबत त्याचा आधार असलेला बैला चा मृत्यु झाल्याने धुमाळ कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

वीजेची तार खाली पडल्याची माहीती वीज वितरणच्या अधिका-यांना कळविले होते.परंतु या संबधीत त्यांनी विद्युत प्रवाह ही बंद केला नाही.अथवा घटना स्थळी लगेच येऊन पहाणी केली नाही.त्यानी त्वरीत वीज प्रवाह बंद केला असता अथव घटना स्थळी पहाणी केली असती तर असा प्रसंग घडला नसता.वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाच्या हलगर्जी पणा मुळे युवकाचा व मुक्या जनावाराचा मृत्यु झाला आहे. या संबधीत रोहा सहाय्यक पोलिस निरीक्षक तायडे यांनी घटना स्थळी जाऊन पहाणी केली.त्या ठिकाणची पहणी करून माहीती घेत पंचनामे त्यांच्या अधिकारी वर्गाने चालु केले होते.या संबधीत गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशीरा पर्यंत चालु होते.

अमोल धुमाळ यांच्या मृत्युने संपुर्ण धुमाळ कुटुंबिये उध्दवस्त झाले असुन त्याच्या मृत्युलाला संपुर्ण पणे वीज वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार आहेत.त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी जिल्हा परीषद सदस्य नंदकुमार म्हात्रे यांनी केली आहे.याच बरोबर त्यांच्या कुटुंबियांना वीज वितरण कंपनीकडून मदत, पत्नीला नोकरी व शासनाकडुन मदत मिळावी आशी मागणी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत