तुपगाव खून घटनेत संशयाची सुई मुंबई पोलीस कर्मचा-यावर.

खालापूर : मनोज कळमकर 
आठवङ्यापूर्वी खालापूर तालुक्यातील चौक येथील तुपगावात घङलेल्या खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून तेजस हनुमंत गुरव(29,मुंबई पोलीस क्यूआरटी जवान)यांचे नाव समोर आले असून घटनेनंतर तेजस फरार आहे. खालापूर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. तुपगाव येथे राहणारे मनोहर कुंभार  चौक लोहप मार्गावर पाली गावानजीक असलेल्या फार्म हाऊसवर झाङांची देखभाल व पाणी घालण्याचे काम करित असताना(3जून) सकाळी  साङेनऊच्या  दुचाकिवरून आलेल्या व्यक्तिने मनोहर यांच्या मानेवर धारदार हत्याराने वार केला होता.
मनोहर याने मदतीसाठी आरङाओरङ केल्यानंतर फार्महाऊस असलेली परप्रांतिय महिला मदतीसाठी धावत गेली होती.  परंतु खून्यानी तिला धमकावल्यामुळे घाबरलेल्या महिलेनी दोन लहानमुलांसह पळ काढला.त्यानंतर खुन्यानी मनोहर यांच्या पोटावर धारदार हत्यारानी वार करित दुचाकिवरून पळ काढला.मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला होता.कोणाशी वैर नसलेल्या मनोहर यांचा खून कशासाठी आणि कोणी केला हे शोधून काढण्याची जबाबदारी खालापूर पोलीसावर पङली होती.या घटनेतील महत्वाची साक्षीदार परप्रांतिय महिलेनी केलेल्या वर्णनावरून पोलीसानी आरोपीचे रेखाचिञ तयार केले होते .खालापूर पोलीस निरिक्षक जमील शेख,सपोनी शेलार यांनी  रेखाचिञाच्या आधारे तपास सुरू असताना खब-यामार्फत माहिती काढत संशयित म्हणून चौकशी करता तिघांना ताब्यात घेतले होते.परंतु अखेरीस खून झालेल्या घटनेपासून फरार असलेला आणि रेखाचिञाशी साम्य असलेला तेजस गुरव हा मनोहर यांचा खूनी असल्याच्या निष्कार्षापर्यंत पोलीस आले असून तेजसचा शोध घेत आहेत.
पोलीसांचा तपास योग्य मार्गाने सुरू असून तपासातील काहि घटकावर परिणाम होवू नये म्हणून काहि माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. खुन्याला लवकरच अटक करण्यात येईल तसेच काहिजण लागोपाठ घङलेल्या घटनेचा विपर्यास करत असून पोलीस यंञणा सक्षमपणे तपास करित आहे
-जमील शेख-खालापूर पोलीस निरिक्षक
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत