तुम्ही खलनायक ठरला; हायकोर्टाच्या निर्णयानंतर कंगनाची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध शिवसेनेचा वाद अखेर मुंबई हाय कोर्टात निकाली लागला आहे. अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर तोडकाम केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आहे. कंगनाने न्यायालयाचे आभार मानत हा लोकशाहीचा विजय आहे, असं म्हणत स्वागत केले आहे. कंगना रनौतने ट्वीट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

‘जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते तेव्हा तो विजय हा व्यक्तीचा नसून तो लोकशाहीचा विजय आहे. ज्यांनी मला धैर्य दिले त्या प्रत्येकाचे आभार आणि ज्यांनी माझ्या तुटलेल्या स्वप्नांचा उपहास केला त्यांचेही आभार’ अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली. तसंच, ‘तुम्ही एक खलनायक म्हणून काम केले त्यामुळेच मी एक हिरो होऊ शकले’, असा टोलाही कंगनाने ठाकरे सरकारला लगावला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत