तुरुंबाडी येथे पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

म्हसळा : निकेश कोकचा 
म्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी येथील कोळी बांधवांच्या विद्यमाने पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदात व उत्सवात साजरा करण्यात आला.गावातर्फे समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला.या ग्रामस्थाच्या आनोंदस्तवात म्हसळा पंचायत समितीच्या सभापती छाया म्हात्रे सहभागी झाल्या होत्या.यानिमित्त तुरुंबाडी ग्रामस्थानतर्फे सभापती छाया म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना छाया म्हात्रे यांनी सांगितले की राष्ट्रवादी  राष्ट्रिय सरचिटणीस सुनिल तटकरे यांच्या मुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य ,गरीब कुटुंबातील व्यक्तीला समाजसेवा करण्याची संधी प्राप्त झाल्यामुळेच मी आपल्या समोर उभी असून केवळ तटकरे साहेबांच्याच माध्यमातून या भागातील विकास कामे झाल्याचे छाया म्हात्रे यांनी सांगितले.रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून तुरुंबाडी येथील अंतर्गत रस्ता मंजूर करण्यात आला असून पंचायत समिती शेष फंडातून तुरुंबाडी येथील चावडीचे काम हाती घेण्याचे आश्वासन या वेळी छाया म्हात्रे यांनी दिले.आगामी लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे यांनी लोकसभेवर बहुमताने निवडून देण्याचे आवाहनही याप्रसंगी छाया म्हात्रे यांनी केले.या प्रसंगी अनंत पाटील,लहूशेठ म्हात्रे,पुरुषोत्तम पाटिल, लक्षुमण पाटिल,नामदेव अनाजी, गोपीनाथ चव्हाण,हरीचंद्र लोधी, ग्रामस्थ,महिला मंडळ आदि मान्यवर उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत