तूर डाळ विक्रीमागे रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो तीन रुपये

 

मुंबई:रायगड माझा 

रास्तभाव दुकानांमधून तूर डाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी
अधिकृत रास्तभाव दुकानदारांमार्फत वितरित होणाऱ्या तूर डाळीकरिता रास्तभाव दुकानदारांच्या निश्चित
केलेल्या मार्जिनमध्ये बदल करण्यात आला आहे. आता रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो तीन रुपये एवढे
मार्जिन देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार रास्तभाव दुकानदारांना अन्न धान्य वितरणासाठी पॉस
मशिनद्वारे होणाऱ्या व्यवहारानुसार वितरीत होणाऱ्या तूर डाळीस रुपये 1.50 प्रतिकिलो व पॉस मशिन
व्यतिरिक्त होणाऱ्या तूरडाळीस 70 पैसे प्रतिकिलो एवढे मार्जिन देण्यात येत होते. तूरडाळीचा विक्री दर
55 रुपये प्रतिकिलो आहे. तूर डाळीला अन्नधान्याप्रमाणे दीड रुपया आणि सत्तर पैसे असा दर देण्यात येत
होता. तूर डाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी मार्जिन वाढविण्यात आली आहे.

राज्यात रास्तभाव दुकानातून आता पर्यंत एकूण 1 लाख 66 हजार 75 क्विंटल तूर डाळीचे वाटप
करण्यात आले असून, त्यापैकी 1 लाख 51 हजार 289 क्विंटल तूर डाळ वितरीत झाली आहे. यात मे
महिन्यासाठी रायगड 444.06 क्विंटल, नंदूरबार 238.62 क्विंटल, सातारा 2250 क्विंटल, सांगली 3836
क्विंटल, कोल्हापूर 2900 क्विंटल. जालना 439.49 क्विंटल, बीड 500 क्विंटल, उस्मानाबाद 150 क्विंटल,
अकोला 500 क्विंटल, वाशिम 400 क्विंटल, अमरावती 1750 क्विंटल, यवतमाळ 2678.94 क्विंटल, नागपूर
2000 क्विंटल, वर्धा 400 क्विंटल, भंडारा 2450 क्विंटल, गोंदिया 4000 क्विंटल, गडचिरोली 595.8 क्विंटल.
पालघर 903 क्विंटल असे एकूण 26 हजार 435.91 क्विंटल वाटप मे महिन्यासाठी झाले आहे.
डिसेंबर 2017 पासून राज्यातील रास्तभाव दुकानदारांना तूर डाळ विक्रीसाठी देण्यात आली आहे.
डिसेंबर 2017 ला राज्यात 84 हजार 499.24 क्विंटल, जानेवारी 2018 मध्ये 37 हजार 533.88 क्विंटल,
फेब्रुवारीमध्ये 8 हजार 812 क्विंटल, मार्च 980 क्विंटल, एप्रिल 6 हजार 436.28, आणि मे महिन्यासाठी
26 हजार 435.91 तूरडाळ वाटप करण्यात आली आहे.
राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजने अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई
केल्यानंतर तुरडाळीची विक्री राज्यातील रास्त धान्य दुकानातून करण्याबाबतचा निर्णय सहकार, पणन व
वस्त्रोद्योग विभागाने दि. 28 नोव्हेंबर 2017 नुसार घेतला होता. या भरडाई केलेल्या तुरडाळीची विक्री
सर्व शिधापत्रिकाधारका रास्तभाव धान्य दुकानामार्फत वितरीत करावयाच्या सूचना दि. 30 नोव्हेंबर
2017 च्या शासन परिपत्रकाद्वारे निर्गमित केल्या होत्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत