तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट; एक ठार

मिदनापूरमधील मकरमपूर येथील कार्यालयात हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, कार्यालयाचा एक भाग पूर्णपणे कोसळला.

कोलकाता : रायगड माझा वृत्त 

पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात गुरूवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट झाला. या स्फोटात पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून इतर ५ जण जखमी आहेत. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी ९ च्या सुमारास हा स्फोट झाला. जखमींपैकी दोघांना उपचारासाठी कोलकाताला दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.

मिदनापूरमधील मकरमपूर येथील कार्यालयात हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्फोट इतका भीषण होता की, कार्यालयाचा एक भाग पूर्णपणे कोसळला. स्फोटानंतर त्वरीत मदतकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांकडून स्फोटाचे कारण शोधण्यात येत असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत