तृतीयपंथींना आत ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी होता येणार

Image result for miss world logoलंडन : रायगड माझा वृत्त 

जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेच्या आयोजकांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. जगभरातील तृतीयपंथींना आत ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ले यांनी हा महत्त्वपूर्ण निर्यण जाहीर केलाय.

मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तृतीय पंथी स्पर्धकांना केवळ एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे. या स्पर्धकांच्या जन्म दाखल्यावर किंवा पासपोर्टमध्ये असलेल्या लिंगाच्या रकान्यात महिला असल्याचा उल्लेख असणं अनिवार्य आहे.

‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेबाबत घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्यणाबाबत बोलताना ज्युलिया मोर्ले म्हणाल्या की,’ तृतीयपंथी व्यक्तींनी पाहिजे त्या क्षेत्रात करिअर करायला हवे. त्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागत आहे. परंतु, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगातील कोणत्याही स्पर्धकाला महिला असणे हा एकमेव निकष लागू पडतो. त्यामुळे या नियमाची पूर्तता होणं गरजेचं आहे. दरम्यान, कोणच्याही लैगिंकतेवर भाष्य करण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचं आनंदानं स्वागत करण्यासाठी मी तिथं उभी असेन. आपण प्रत्येकाच्या मतांचा, लैंगिक निवडीचा आदर करायला पाहिजे.’ असा त्या म्हणाल्या.

स्पेनची अँजेला पॉन्स ही मिस युनिव्हर्स २०१८ मध्ये सहभागी होणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत