तेरा शिकाऱ्यांना वनविभागाने अडकवले जाळ्यात!

महाड : रायगड माझा वृत्त

 मंडणगड तालुक्यातील तिरडे-बौध्दवाडी येथे शिकारी साठी गेलेल्या महाडमधील तेरा जणांना वनविभागाने जाळ्यात अडकवले आहे. या शिका-यांकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, बंदुक, रायफल व मृत अवस्थेतील ससा वनविभागाने ताब्यात घेतला आहे. दापोलीचे वनक्षेत्राधिकारी सुरेश वरक यांनी ही कारवाई केली.

महाडमधील हे तेरा जण शिकारीसाठी आले असल्याची माहीती वनविभागाला हॅलो फॉरेस्ट या पोर्टलवरून मिळाली होती. यानंतर, तातडीने सुरेश वरक यांनी आपले सहकारी अमित निमकर, एम. जी. पाटील, एन. के. जांभळे, डी. आर. भोसले, संतोष परशेट्ये, सिध्देश्वर गायकवाड यांच्यासह मंडणगड येथे धाव घेतली आणि एका पिकअप् गाडी मधून शिकारीसाठी जात असलेल्या या टोळीची झडती घेतली असता, त्यांच्याकडून मृत अवस्थेतील ससा, एक सिंगल बेरल बंदुक, एक जिवंत काडतूस, रायफल, चार्जिंग बॅटरी इत्यादी शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळाले. हे साहित्य तसेच वाहन व तेरा जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. सौरभ लाड, अशोक आंबवले, अमित आंबवले, रविंद्र जाधव, अमित पवार, अविनाश भोसले, अनिल खेडेकर, विनय नगरकर, प्रविण गायकवाड, रणजित खेडेकर, संदेश महाडिक, योगेश सावंत व  नीलेश मोटे यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत