तेलंगणा: बस अपघातात ३२ भाविकांचा मृत्यू

हैदराबाद : रायगड माझा ऑनलाईन

तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाची (टीएसआरटीसी) बस आज कोंडागट्टू येथे दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३२ भाविकांचा मृत्यू झाला. बस घाटामधील अरुंद रस्त्यावरून प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

ज्या बसला अपघात झाला आहे ती बस जगत्याळ जिल्ह्यातील टीएसआरटीसी डेपोची आहे. या बसमधून ६२ भाविक प्रवास करत होते. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३२ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित जखमी झाल्याचे वृत्त आहे. बसमधील सर्व भाविक श्री आंजनेय स्वामी मंदिरात दर्शनासाठी चालले होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळण्यापूर्वी चार वेळा पलटी झाली. त्यानंतर ती दरीत कोसळली. या अपघाताबद्दल तेलंगणाचे काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दुखः व्यक्त केले आहे. त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत