तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांकडून अमित शहांच्या ताफ्यावर दगडफेक

 

हैदराबाद : रायगड माझा

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांना एनडीएतून बाहेर पडलेल्या तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी अमित शहांच्या ताफ्यावर दगडफेक केली. या ताफ्यातील एका कारच्या काचा फुटल्या. मात्र शहा यांच्या गाडीचे कोणतेही नुकसान झाले नाही.

आज अमित शहा यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन अमित शहा हे तिरुमला हिल येथून रेनीगुंटा विमानतळाकडे परतत असताना तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. ‘अमित शहा गो बॅक’चे नारे दिले.

बेशिस्त खपवून घेणार नाही – चंद्राबाबू

कार्यकर्त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये. यापुढे असली बेशिस्त खपवून घेणार नाही, असा इशारा तेलगू देसमचे अध्यक्ष, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.

आंध्रात भाजपविरुद्ध जनतेत असंतोष

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ, विशेष पॅकेज देऊ अशी आश्वासने भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती, पण चार वर्षांत आश्वासने न पाळल्यामुळे तेलगू देसम पक्ष ‘एनडीए’तून बाहेर पडला आहे. तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच आंध्र प्रदेशातील जनतेमध्ये भाजपविरुद्ध प्रचंड असंतोष असल्याचे वृत्त आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत